Ad will apear here
Next
‘कौशल्याभिमुख गोष्टी आत्मसात कराव्यात’
पुणे : ‘गुणवत्ता नसलेल्या पदवीधारकांनाच बेरोजगारीच्या समस्येला सामोरे जावे लागते. ज्यांच्याकडे सृजनशीलता आणि नाविन्यतेचा ध्यास आहे, अशा अभियंत्यांना नोकरी आणि व्यवसाय या दोन्ही क्षेत्रात मोठ्या संधी आहेत. त्यामुळे अभियांत्रिकीची पदवी घेताना कौशल्याभिमुख गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत,’ असे प्रतिपादन ‘टेकमहिंद्रा’चे धनंजय दिवाण यांनी केले.

केजे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट व इंटरनॅशनल इन्स्टिट्यूशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनच्या (आयईटीई) यांच्या संयुक्त विद्यमाने केजे संकुलात आयोजित ‘ग्रॅव्हिटी २०१८’ महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी प्रसंगी ‘टेकमहिंद्रा’चे वरिष्ठ व्यवस्थापक प्रकाश काजवे, डीपर संस्थेचे हरीश बुटले, ‘आयईटीई’चे एस. के. खेडकर, फिनोव्हेशन टेकचे वाँग हाँग, ओहा सोल्युशनचे प्रशांत करंदीकर, केजे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कल्याण जाधव, कार्यकारी संचालक डॉ. हेमंत अभ्यंकर, डॉ. व्यासराज काखंडकी, संस्थेचे खजिनदार विनोद जाधव, व्यवस्थापकीय संचालक हर्षदा जाधव, केजे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य आणि ‘ग्रॅव्हिटी २०१८’चे समन्वयक डॉ. सुहास खोत, ट्रिनिटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश डबीर, ट्रिनिटी अॅकॅडमीचे प्राचार्य डॉ. विजय वाढई, पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. जयंत वारके, प्रा. दीपक मेहेत्रे, प्रा. प्रतिभा चव्हाण यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

या वेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महाविद्यालयातील विद्यार्थी प्रकाश गावडे याला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रथम आल्याबद्दल लॅपटॉप देऊन सन्मानित करण्यात आले; तसेच संकुल संचालक डॉ. व्यासराज काखांडकी यांच्या संकल्पनेतून ‘कँपस कनेक्ट’ या न्यूजलेटरचे प्रकाशन करण्यात आले. दोन दिवसीय महोत्सवात पाचशेहून अधिक संशोधन प्रकल्प आणि पोस्टर्स सहभागी झाले आहेत.

प्रकाश काजवे म्हणाले, ‘हे तंत्रज्ञानाचे युग आहे. त्यामुळे झपाट्याने बदल होत आहेत. बदल आयुष्याचा अविभाज्य घटक असून, तो आपण काळाबरोबर स्वीकारला पाहिजे. नवतंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. जो काळाबरोबर नवी आव्हाने स्वीकारतो तोच टिकून राहतो.’

हरीश बुटले म्हणाले, ‘तांत्रिक कौशल्यासोबतच नैतिक व सामाजिक मूल्ये आपण अंगिकारली पाहिजेत. त्यातूनच एक चांगल्या अभियंत्यासह चांगल्या व्यक्तीची निर्मिती होते. कुटुंबाच्या, देशाच्या विकासाठी आज नीतिवान नागरिकांची गरज आहे.’

कल्याण जाधव म्हणाले, ‘आपल्या देशात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत; मात्र, त्यासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळाचा अभाव आहे. केजे शिक्षण संस्था कौशल्याभिमुख अभियंते निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. राज्य व केंद्र सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या योजनांचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा.’

‘विद्यार्थ्यांतील संशोधन वृत्ती वाढावी व नवनिर्मितीचा चालना मिळावी, यासाठी ग्रॅव्हिटी महोत्सव आयोजित केला जातो,’ असे डॉ. सुहास खोत यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZKWBM
Similar Posts
‘अनुभवाच्या शिक्षणातूनच माणूस घडतो’ पुणे : ‘पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवाचे शिक्षण माणूस घडण्यासाठी पूरक असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चौकटीबाहेर जाऊन विचार केला पाहिजे; तसेच अनुभवातून नव्या गोष्टी शिकत करिअर घडवावे. विद्यार्थी ते माणूस या प्रक्रियेत महाविद्यालयाचे महत्त्वाचे योगदान असते. त्यामुळेच माजी विद्यार्थी मेळाव्यातून महाविद्यालयाप्रती
‘लोक काय म्हणतील, याचा विचार करू नका’ पुणे : ‘कायद्याने मुलींना अधिक संरक्षण दिले आहे. त्याचा चांगला वापर करून अन्यायाविरोधात आवाज उठवला पाहिजे. एक जबाबदार भारतीय नागरिक म्हणून आपण आपली कर्तव्ये बजवावीत. ‘लोक काय म्हणतील’ ही भीती मनातून काढून टाकून स्वतःला घडविण्यासाठी प्रयत्न करावेत,’ असा सल्ला पुणे शहर वाहतूक पोलिस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी विद्यार्थिनींना दिला
‘विद्यार्थ्यांनी संशोधनावर भर द्यावा’ पुणे : ‘विद्यार्थ्यांमधील कला-गुणांना वाव देण्यासाठी महाविद्यालयीन स्तरावर विविध उपक्रम होत असतात. त्याचा फायदा करून घेत विद्यार्थ्यांनी संशोधन करण्यावर भर दिला पाहिजे. नाविन्यपूर्ण कल्पना आणि संशोधक वृत्ती असणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील काळात अनेक संधी आहेत,’ असे प्रतिपादन सासवड येथील गुरुकुल अॅकॅडमीच्या संचालिका उषा टिळेकर यांनी केले
‘ट्रिनिटी’च्या अमरजित जाधवला मिळाले ७० लाखांचे पॅकेज पुणे : येवलेवाडी येथील केजे शिक्षण संस्थेच्या ट्रिनिटी अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक अभियांत्रिकीचा विद्यार्थी अमरजित जाधव याला अमेरिकास्थित बहुराष्ट्रीय कंपनीत वार्षिक ७० लाखांचे पॅकेज असलेली नोकरी मिळाली आहे, तर संस्थेच्या केजे अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचा

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language